ओसाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगातील अन्य देशातील नेत्यांनाही मोदींच्या लोकप्रियतेचं कौतुक आहे. जपानमधील ओसाका येथील जी २० परिषदेमध्ये स्कॉट मॉरिसन यांनी मोदींसोबत एक सेल्फी घेत तो आपल्या टि्वटरवर शेअर केला आहे. या सेल्फीला पंतप्रधान मोदी यांनी ही उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी शेअर केलेल्या Selfie ला मोदींनी दिले 'हे' उत्तर - Scott Morrison
जपानमधील ओसाका येथील जी २० स्कॉट मॉरिसन यांनी मोदींसोबत एक सेल्फी घेत ती आपल्या टि्वटरवर शेअर केली आहे. या सेल्फीला पंतप्रधान मोदी यांनी ही उत्तर दिले आहे.
जी 20 या शिखर परिषदेचा आज शेवटचा दिवस आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांच्यासोबत सेल्फी काढला. त्यांनी या सेल्फीला 'मोदी किती चांगले आहेत', असे कॅप्शन दिले आहे. त्यावर मोदी यांनी देखील आपल्या टि्वटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. 'आमच्या द्विपक्षीय संबधामधील उर्जा पाहून मी थक्क झालो आहे', असे टि्वट मोदींनी केले आहे.
आज जी 20 परिषदेत पर्यावरणासारख्या गंभीर मुद्द्यावर जगातील नेत्यांची चर्चा झाली आहे. या बैठकीत पुढील 2050 पर्यंत जगातील समुद्रात असणारा प्लास्टिक कचरा संपुष्टात आणण्यासाठी एकमत झाले आहे.