हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे.
या नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण -
बोरीस जॉन्सन -इंग्लडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना 27 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. ते आपल्या घरामध्ये क्वारंटाइन झाले होते. मात्र, प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते तीन दिवस आयसीयूमध्ये होते.
प्रिन्स चार्ल्स - प्रिन्स चार्ल्स यांची 25 मार्चला कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ते 30 मार्चपर्यंत आयसोलेशनमध्ये होते. ते अद्यापही सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत.
जैर बोलसोनारो - ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांना 7 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना दोनदा कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण होण्याआधी बोलसोनारो अनेक वेळा गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गेलेले होते. अनेक वेळा त्यांनी मास्कही घातले नव्हते.
रशियाचे पंतप्रधान - मिखाइल मिशुस्तिन यांना 30 मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेट केले होते. जानेवरीमध्ये त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती.
व्लादिमिर याकुशेव - रशियाचे बांधकाम मंत्री व्लादिमिर याकुशेव यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
ईराणच्या नेत्यांना कोरोनाची लागण -ईराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तेकार यांना 27 फेब्रुवरीला कोरोनाची लागण झाली होती. त्या घरामध्ये आयसोलेट झाल्या होत्या. तसेच इराणचे उप-आरोग्य मंत्री इराज हरिची - इराज हरिची यांना कोरोनाची लागण झाली होती.