महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सामूहिक प्रतिकाराने कोरोनाला रोखणे शक्य, संशोधकांचा दावा - सामूहिक प्रतिकाराने कोरोनाला रोखणे शक्य

सामूहिक प्रतिकार दोन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात अनेक आजार हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत असतात. अशात जेव्हा अधिक लोक या रोगाचे संक्रमण होण्यापासून वाचतात किंवा तो पसरु नये याची काळजी घेतात तेव्हा या रोगाची साखळी तोडण्यात मदत होते. दुसऱ्या प्रकारात याची कमजोर किंवा टीकाकरण न झालेल्या लोकांचा बचाव करण्यास मदत होते.

herd immunity may be answer to corona virus
सामूहिक प्रतिकाराने कोरोनाला रोखणे शक्य

By

Published : May 13, 2020, 11:41 AM IST

नवी दिल्ली - काही संशोधकांचे म्हणणे आहे, की कोरोनाचा सामना करण्यासाठी सामूहिक किंवा गट प्रतिकार करणे महत्तवाचे आहे. सामूहिक प्रतिकार म्हणजेच जेव्हा एखादा समुदाय किंवा अनेक लोक एखाद्या रोगासोबत लढण्यासाठी तयार होतात. यामुळे, रोगाचा फैलाव होण्यापासून रोखला जावू शकतो.

सामूहिक प्रतिकार म्हणजे काय -

सामूहिक प्रतिकार दोन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात अनेक आजार हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत असतात. अशात जेव्हा अधिक लोक या रोगाचे संक्रमण होण्यापासून वाचतात किंवा तो पसरु नये याची काळजी घेतात तेव्हा या रोगाची साखळी तोडण्यात मदत होते. दुसऱ्या प्रकारात याची कमजोर किंवा टीकाकरण न झालेल्या लोकांचा बचाव करण्यास मदत होते. ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी म्हटलं आहे, की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.

स्वीडनचे उदाहरण -

स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य एजंसी महामारी विज्ञानाचे प्रमुख यांनी सांगितले, की स्टॉकहोमच्या आसपास स्वीडनच्या प्रमुख भागांमध्ये सामूहिक प्रतिकाराचे उत्तम परिणाम पाहायला मिळाले. जेव्हा युरोपमधील प्रमुख भाग कोरोनामुळे लॉकडाऊन होते, तेव्हा स्वीडनने काहीच प्रमाणात निर्बंध लावून सर्व परिस्थिती हाताळली.

सामूहिक प्रतिकार आणि तरुणांची संख्या -

प्रिंसटन विश्वविद्यालयातील संशोधक तसेच नवी दिल्ली आणि वाशिंगटनमधील सेंटर ऑफ डीजीज डायनमिक्स इकोनॉमिक्स ऑफ पॉलिसी टीमने सांगितले, की ही पद्धत भारतात खूप प्रभावीपणे काम करु शकते. कारण इथे तरुणांची संख्या जास्त आहे आणि तरुणांना कोरोनाची लागण होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी आहे.

प्रमुख महामारी विशेषज्ञ जय प्रकाश मुलियाल म्हणाले, की कोणताही देश अधिक काळ लॉकडाऊन नाही करु शकत. विशेषतः भारतात तर हे जास्त काळ शक्य नाही. अशात भारताने ही पद्धत अवलंबवल्यास येथील वृद्धांनाही कोरोनाची लागण होण्यापासून वाचवले जाऊ शकते. सोबतच असे केल्यास नोव्हेंबरपर्यंत या विषाणूवर 60 टक्क्यांपर्यंत प्रतिकार केला जाऊ शकतो.

सामूहिक प्रतिकारादरम्यान येणाऱ्या समस्या -

समजातील कमजोर घटक तसे वृद्धांमध्ये या विषाणूने शिरकाव केल्यास ते खूप लवकर आजारी पडू शकतात. सोबतच निरोगी आणि तरुण वर्गही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात आजारी होऊ शकतो. यामुळे जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्यास आरोग्य आणि रुग्णालयातील रुग्णांकडे दुर्लक्ष होऊन त्यावरही परिणाम होऊ शकतो. अशात आतापर्यंत कोरोनावर लसही उपलब्ध झाली नाही. लसीकरण हा सामूहिक प्रतिकारावर अभ्यास करण्याचा उत्तम उपाय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details