नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्ता गमविलेल्या भाजपला झारखंडमध्येही पराभूत व्हावे लागले आहे. झारखंडमधील यशाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले. त्यावर हेमंत सोरेन यांनी ट्विटरवर आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील आपल्या लढ्याने आम्हा सर्वांना प्रेरणा मिळत आलेली आहे, असे हेमंत सोरेन यांनी शरद पवारांना दिलेल्या ट्विटरवरील प्रतिक्रियेत म्हटले आहे.
हेही वाचा-झारखंडमध्ये जेएएम-काँग्रेस आणि आरेजडीचा विजय; सोनिया गांधींनी जनतेचे मानले आभार
झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत ४७ जागा जिंकल्या आहेत. तर निवडणुकीत ६५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या ठेवणाऱ्या भाजपला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजप ३७ जागांवर विजय मिळविला होता.
हेही वाचा-लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र
शरद पवारांनी सोरेन यांचे असे केले अभिनंदन-
झारखंडच्या निवडणुकीत जबरदस्त विजय मिळविल्याबद्दल आपले आभार. झारखंडमधील बहुमताने नवा पॅटर्न अधोरेखित झाला आहे. त्यामुळे भाजपकडून देशाचे भगवेकरण होत असल्याची प्रक्रिया कमी होण्यासाठी मदत होणार असल्याचे पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.