मसूरी -उत्तराखंडमधील मसूरी येथे मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला आहे. परिमाणी वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. हिमवर्षा होत असल्यामुळे शेकडो पर्यटकांना मसूरी प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने डेहराडून पाठवले जात आहे.
मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाल्यामुळे अनेक वाहने अडकून पडले आहेत. या वाहनांना काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करीत आहे. तसेच रस्त्यावर साचलेला बर्फ जेसीबीच्या सहाय्याने हटवला जात आहे. मसूरी मालरोडवर साचलेला बर्फ हटवून वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. शिवाय या हिमवर्षाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी मसूरीमध्ये गर्दी केली आहे. मात्र, रस्ते जाम असल्यामुळे पर्यटकांनी जवळपास ४ किलोमीटर पायी चालून बर्फाचा आनंद घेतलेलाही येथे पाहायला मिळाले.