अमरावती (आंध्रप्रदेश) - पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. विशेषत: भद्राचलम येथे गुरुवारी सायंकाळी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर, कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ - कृष्णा नदी पाऊस
श्रीशैलम जलाशयाचे सात क्रेट गेट उघडले असून वीज निर्मितीसाठी ३.८४ लाख क्सुसेक पाणी सोडले जात आहे. नागार्जुन सागर धरणात गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत १.६९ लाख क्युसेक पाण्याची आवक झाली होती.
आंध्र प्रदेशातील डोव्हलेस्वरम येथील सर आर्थर कॉटन बॅरेज भागातही पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीही ओसंडून वाहत असून श्रीशैलम जलायशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. जलाशयाची पाणी पातळी सध्या २११.०४ टीएमसी एवढी झाली आहे. यामुळे जलाशयाचे सात क्रेट गेट उघडले असून वीज निर्मितीसाठी ३.८४ लाख क्सुसेक पाणी सोडले जात आहे. नागार्जुन सागर धरणात गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत १.६९ लाख क्युसेक पाण्याची आवक झाली होती. शुक्रवारी या पाणी पातळीत अजून वाढ होऊ शकते. भद्राचलम येथे गोदावरी नदी जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचली आहे. ४५.७२ अशी इशारा पातळी असून सध्या पाण्याची पातळी ४३ मीटरपर्यंत पोहोचली आहे.
हेही वाचा -देशभरातील कोरोना संबंधीच्या ताज्या घडामोडी.... एका क्लिकवर