पाटणा - बिहारची राजधानी पाटणा शहराला मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे भागलपूर जिल्ह्यामध्ये भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. भिंतीखाली अजून लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तर झाड रिक्षावर कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमध्ये पावसाचा हाहाकार, भिंत कोसळून ६ ठार, तर रिक्षावर झाड कोसळून चौघांचा मृत्यू
जोरदार पावसामुळे भागलपूर जिल्ह्यामध्ये भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
खागौल येथे रिक्षावर भिंत कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. पटना शहरामध्ये राज्य आपत्ती निवारण पथकाने मदतकार्य हाती घेतले आहे. शहरातील राजेंद्रनगर भागामध्ये नागरिक आणि जनावरे पाण्यामध्ये अडकून पडले आहेत. आपत्ती निवारण पथक अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहे. अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावर अडकून पडले आहेत. आपत्ती निवारण पथक घरांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढत आहे. शहरातील पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकही घरे सोडून सुरक्षित स्थळी जात आहेत. गरजेचे सामान घेऊन नागरिक पाण्यातून मार्ग काढत आहेत. राज्य सरकारकडून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.