नवी दिल्ली - उत्तर आणि मध्य भारतातील काही भागात उष्ण वारे वाहतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर, पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मान्सून सक्रिय झाल्याने उष्णता वाढणार आहे.
येत्या २४ तासांत उष्णतेच्या लाटा वाहतील, हवामान खात्याचा इशारा
दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागात ४७ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. विदर्भ, पश्चिम राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा वाहत असल्याचे आयएमडीने म्हटले आहे
हवामान
दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागात ४७ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. विदर्भ, पश्चिम राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा वाहत असल्याचे आयएमडीने म्हटले आहे
हरयाणा, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा, सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, तेलंगाणा या भागात उष्णतेच्या लाटा वेगाने वाहत आहेत, अशी माहिती आयएमडीचीने दिली आहे.