महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रावणबाळ! सायकल रिक्षातून आई-वडिलांना मूळगावी घेऊन निघाला ११ वर्षांय मुलगा

उत्तर प्रदेशमध्ये एक श्रावण बाळ पाहायला मिळाला आहे. एक 11 वर्षीय मुलगा स्वत: सायकल रिक्षा चालवत आपल्या आई-वडिलांना गावी घेऊन निघाला आहे.

तेबरा आलम
तेबरा आलम

By

Published : May 16, 2020, 11:37 AM IST

नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत असून ते आपल्या मुळ गावी निघाले आहेत. अशातच उत्तर प्रदेशमध्ये एक श्रावण बाळ पाहायला मिळाला आहे. एक 11 वर्षीय मुलगा स्वत: सायकल रिक्षा चालवत आपल्या आई-वडिलांना गावी घेऊन निघाला आहे.

तेबरा आलम असे या मुलाचे नाव आहे. तेबराचे कुटुंब वाराणसीमध्ये राहत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कुटुंबाचे कमाईचे साधन बंद झाल्याने त्यांनी आपल्या बिहारमधील आरिया जिल्ह्यामधील मूळगावी जाण्याचे ठरवले. सार्वजनिक वाहतुकीच्या अनुपलब्धतेमुळे ते सायकल रिक्षाने प्रवास करत घराच्या दिशेने निघाले आहेत. आलम आणि त्याचे वडील आलटून पालटून सायकल रिक्षा चालवत आहेत.

लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. भारतात लाखो कामगारांचे जीवन हे रोज मिळणाऱ्या कामावर असून त्यातून मिळणाऱ्या पैश्यातून त्यांचा दिवस कसाबसा जातो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोट भागवणार कसं? हा यक्षप्रश्न या मजूर वर्गासमोर आ वासून उभा राहिला.

ABOUT THE AUTHOR

...view details