कुरुक्षेत्र- आज प्लास्टिक प्रदूषण पर्यावरणासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातील एकेरी वापरातील प्लास्टिक (सिंगल यूज प्लास्टिक) सर्वात जास्त धोकादायक आहे. भारतासारख्या विकसनशील देशासाठी प्लास्टिक कचरा समस्या बनून उभा आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक कचऱ्यामुळे हृदयरोग आणि फुफ्फुसासंबधी आजारांचा धोका.. आपल्या देशात कचरा गोळा करणे आणि त्याच्या पुर्नप्रक्रियेची योग्य व्यवस्थाही नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या सोडवणं अवघड होऊन बसले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१२ च्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात २६ हजार टन कचरा निर्माण होतो. यापेक्षा वाईट म्हणजे यातील १० हजार टन कचरा गोळा करता येणे आपल्याला शक्य होत नाही.
प्लास्टिक वापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत 'ईटीव्ही भारत'ने श्वसन रोग तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र सैनी यांच्याशी चर्चा केली. प्लास्टिक कचऱ्यामधून विषारी वायू बाहेर निघतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकही होऊ शकतो. फुफ्फुसापर्यंत घातक रसायने पोहचल्याने गंभीर आजार होतात. त्यामुळे हृदय विकारही होऊ शकतो, असे डॉ. सैनी यांनी सांगितले.
श्वसनाशी संबधित आजार असणाऱ्या रुग्णांवर डॉ. सैनी उपचार करतात. याशिवाय प्लास्टिकच्या दुष्परिणामांचाही ते अभ्यास करत आहेत. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे आजार आणि धोके यांच्यासंबधी माहिती ते गोळा करत आहेत. पर्यावरण आणि आरोग्याची काळजी करत डॉ. सैनी यांनी प्लास्टिकला पर्यायी उत्पादने वापण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : पर्यावरण रक्षणासाठी आंध्र प्रदेशातील इंद्रकीलाद्री मंदिरात प्लास्टिक बंदी