महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डी. के. शिवकुमार यांची जामीन याचिकेवरील सुनावणी १५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली - डी. के शिवकुमार इडीच्या अटकेत

कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची जामीन मागणारी याचिकेवरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

डी. के. शिवकुमार

By

Published : Oct 14, 2019, 5:31 PM IST

नवी दिल्ली - कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची जामीन मागणारी याचिकेवरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. शिवकुमार यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.


शिवकुमार यांची जामीन मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका कनिष्ठ न्यायालयाने फेटाळली होती. त्यावर शिवकुमार यांनी त्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायाधीश सुरेश कुमार यांनी ईडीला उत्तर मागितले होते. त्यावर आज सुनावणी होती. मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.


आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने डी. के शिवकुमार यांना ३ सप्टेंबरला अटक केली होती. गेल्या वर्षी ईडीने त्यांच्या विरूद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याबाबत प्रकरण दाखल केले होते. कर चोरी, हवाला याप्रकरणी शिवकुमार यांच्याविरूद्ध प्रकरणे दाखल करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details