नवी दिल्ली - कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्ष के. आर रमेश आमचे राजीनामे स्वीकारत नाहीत. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावामध्ये कुमारस्वामी सरकारला मत देण्याची बळजबरी आमच्यावर होईल आणि तसे न केल्यास आम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, असे बंडखोर आमदारांनी न्यायालयात सांगितले.
काँग्रेस- जेडीएस सरकार अल्पमतात असून आमदारांचे राजीमाने स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, असे आमदारांचे वकिल मुकुल रोहतगी यांनी सांगितले. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. राजीनामा न स्वीकारल्याबाबत १० बंडखोर आमदार आपली बाजू मांडत आहेत. त्यानंतर आणखी ५ आमदारांच्या राजीनाम्यावरही सुनावणी होणार आहे.