नवी दिल्ली - पंजाब राज्यामध्ये कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजेच सामाजिक फैलाव झाल्याचा दावा मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केला आहे. मात्र, पंजाबमध्ये कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झाले नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत 137 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
पंजाबमध्ये कोरोनाचा सामाजिक फैलाव नाही, मुख्यमंत्र्यांचा दावा आरोग्य मंत्रालयाने फेटाळला
देशामध्ये कोरोनाचा सामाजिक स्तरावर फैलाव झाला नसून घाबरून जाण्याची गरज नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देशामध्ये कोरोनाचा सामाजिक स्तरावर फैलाव झाला नसून घाबरून जाण्याची गरज नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्य परिस्थितीत कोरोन स्थानिक स्तरावर किंवा सामाजिक स्तरावर पोहचला आहे, हे आव्हान नाही. कोरोनाचा प्रसार कोणत्या स्तरावर आहे, हे आम्ही तुम्हाला कळवू, आत्ता घाबरून जाण्याची गरज नाही, असे अगरवाल म्हणाले.
काल(गुरुवारी) एकूण 16 हजार 2 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी फक्त 2 टक्के लोकांनाच कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. संसर्गाचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात नाही. रॅपीड डायग्नॉस्टिक किटद्वारे चाचण्या घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.