नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे २९ रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात करण्यात आलेल्या तयारीवर उत्तर दिले. लोकसभेमध्येही त्यांनी कोरोनावर उत्तर दिले. 'मी स्वत: हा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तसेच मंत्रीगटही परिस्थितीचा आढावा घेत आहेत', असे हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितले.
राज्यसभेत देशातील कोरोना संसर्गावर चर्चा, आरोग्य मंत्री म्हणाले... - केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन
१८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. - आरोग्य मंत्री हर्षवर्धन
१८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. आता परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. N९५ मास्क आणि अन्य वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर १९ आणखी तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एक कॉल सेंटरही उभारण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आम्ही संपर्कात आहोत. इराणमधील तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी हर्षवर्धन यांनी सांगितले.
चीनमधील वुहानमध्ये अडकेलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथून आलेल्या नागरिकांची 'टेस्ट निगेटिव्ह' आहे. चीन, जापन, इटलीला जाणाऱ्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. गरज नसेल तर चीन आणि इटलीला जाऊ नका. ४ मार्चपर्यंत ६ लाख ११ हजार १७६ प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मदतीसाठी आरोग्य मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.