नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. आंदोलकांनी यावेळी पोलिसांवर दगडफेक तर केलीच तसेच एका व्यक्तीने गोळीबारही केला. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन आंदोनकर्त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १२ जण जखमी असून यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांची प्रकृती गंभीर आहे.
यावेळी एक तरूण हातात रिवॉल्व्हर घेऊन रस्त्यावर गोळीबार करत होता. दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध लावला असून संबंधित व्यक्तीचे नाव शाहरूख असल्याचे तपासात समोर आले आहे.
यावेळी एक तरूण हातात रिवॉल्व्हर घेऊन रस्त्यावर गोळीबार करत होता.
हेही वाचा -सीएए : अलीगढमधील दगडफेकीनंतर 'एएमयू'च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू..
या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मौजपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाविरोधात एका गटानेही प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. यादरम्यान, बाचाबाचीचे रुपांतर दगडफेकीमध्ये झाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांवरही जमावाने जोरदार दगडफेक केली. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.
दिल्लीच्या मौजपूरमध्ये हिंसाचार
दरम्यान, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथकही मौजपूरमध्ये पोहोचले आहे.
मौजपूरमध्ये हिंसाचार, दुकानांना लावली आग..