अलाहाबाद - सरकारी जमीन वाटप करण्याच्या घोटाळ्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार मोहम्मद आझम खान यांच्या पत्नी आणि मुलाला मंगळवारी जामीन मंजूर केला.
हेही वाचा -राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून मी आश्चर्यचकित; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र
सुरुवातीला सरकारी वकील आणि खान यांच्या वकिलांचा युक्तीवाद झाला. यानंतर न्यायमूर्ती सिद्धार्थ यांच्या खंडपीठाने आमदार ताझीन फातमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांच्या जामीन अर्जास परवानगी दिली.
या दोघांना जामीन मंजूर करताना खंडपीठाने खटला चालवणाऱया ट्रायल कोर्टाला त्यांच्याविरूद्ध झालेल्या फसवणूकीचा खटला एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा -फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण