नवी दिल्ली - उच्च न्यायालयाने शुक्रवारी फोर्टीसचा माजी संस्थापक मालविंदर मोहन सिंग याला अंतरीम जामीन नाकारला. रेलीगेअर फिनव्हेस्ट कंपनीतील निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली मालविंदर मोहन सिंगला अटक करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती अनु मल्होत्रा यांनी सांगितले की, सिंह यांनी जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ठरविलेल्या निकषांची पूर्तता केली नाही. त्याला १० वर्षाचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल, असे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहे, असेही मल्होत्रा यांनी नमूद केले.