महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तुमचे कष्ट आणि संकल्प आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत, अमित शाह यांनी मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - pm modi birthday

विकासाबरोबरच भारतीय संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी मोदींचे मोठे योगदान आहे, अमित शाह

मोदी अमित शाह

By

Published : Sep 17, 2019, 11:54 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मोदींच्या कार्यक्षम नेतृत्त्वाखाली देश सतत प्रगती करत आहे, असे उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींच्या नेतृत्त्वामुळे जगामध्ये भारताची स्वत:ची अशी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. मजबूत, सुरक्षित आणि विश्वासहार्य देश म्हणून भारत पुढे येत आहे. प्रत्येक भारतीयाचे जीवन सुकर बनवण्यासाठी तुमचे कष्ट आणि संकल्प आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. एक भारतीय आणि नेता म्हणून तुमच्यासोबत देशाच्या विकासासाठी काम करण्याचे भाग्य लाभले, असे शाह यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

विकासाबरोबरच भारतीय संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी मोदींचे मोठे योगदान आहे. तसेस अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कायमचा तोडगा मोदींनी काढला. दृढ इच्छाशक्ती, नेतृत्त्व, अथक परिश्रमाचे प्रतिक आणि देशाचे सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे अमित शाह म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या दुरदर्शी नेतृत्त्वामुळे देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details