नवी दिल्ली - पोलिसांनी मला धक्काबुक्की करत गळा पकडला असा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा आरोप उत्तर प्रदेश महिला पोलीस अधिकारी अर्चना सिंह यांनी फेटाळला आहे. याप्रकरणी त्यांनी एक पत्रक जारी केले आहे.
'प्रियांका गांधींचा धक्काबुक्की करत गळा पकडल्याचा आरोप खोटा'
पोलिसांनी मला धक्काबुक्की करत गळा पकडला असा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा आरोप उत्तर प्रदेश महिला पोलीस अधिकारी अर्चना सिंह यांनी फेटाळला आहे.
प्रियांका गांधी यांची गाडी ठरलेल्या मार्गावरून न जाता दुसर्या मार्गावर जात होती. त्यामुळे सुरक्षा लक्षात घेऊन त्यांच्या गाडीला थांबवावे लागले. तसेच सोशल माध्यमांवर त्यांचा गळा पकडला आणि त्यांना धक्काबुक्की केली, या सर्व खोट्या गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. मी माझे कर्तव्य इमानदारीने पार पाडले आहे, असे अर्चना यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा -लग्नाला वयाचं बंधन नसतं! केरळमध्ये वृद्ध जोडप्याचा विवाह
काय प्रकरण?
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसा केल्याप्रकरणी अटक झालेल्या निवृत पोलीस निरक्षकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी जात होत्या. यावेळी पोलिसांकडून त्यांची कार लोहिया येथील चौकात अडवण्यात आली. त्यावर प्रियांका तेथून पायी निघाल्या. मात्र त्यावेळी महिला पोलिसांनी त्यांना अडवत गळा पकडत गैरवर्तन केले, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.