महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हाथरस प्रकरण : आरोपींच्या उलट्या बोंबा; म्हणे पीडितेच्या आई-भावानेच केली हत्या

ज्या रात्री पीडितेची हत्या झाली त्या रात्री संदीप आणि तिची भेट झाली होती. यावेळी शेतात पीडितेची आई आणि भाऊही होते. संदीपचे पीडितेला भेटणे त्यांना आवडले नाही, त्यामुळे त्यांनी संदीपला तिथून जाण्यास सांगितले. त्यानंतर आपल्याला गावातील लोकांकडून समजले, की पीडितेच्या आई आणि भावानेच तिला मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला. असे या आरोपींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

hathras gangrape accused wrote letter to superintendent of police
हाथरस प्रकरण : आरोपींच्या उलट्या बोंबा; म्हणे पीडितेच्या आई-भावानेच केली हत्या

By

Published : Oct 8, 2020, 12:21 PM IST

Updated : Oct 9, 2020, 11:53 AM IST

लखनऊ : हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणात नवा मुद्दा समोर आणण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींनी हाथरसच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे. या मुलीची हत्या तिच्या आई आणि भावानेच केल्याचा या आरोपींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

संदीप, लव-कुश, रवी आणि रामू या चार आरोपींनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. आरोपी संदीप याने पीडितेबरोबर आपली मैत्री होती. आपण तिला वेळोवेळी भेटत होतो, तसेच आमचे फोनवरही बोलणे होत असे पोलीस अधीक्षकांना लिहीलेल्या पत्रात सांगितले आहे. ज्या रात्री पीडितेची हत्या झाली त्या रात्री पीडितेला भेटल्याचेही त्याने या पत्रात स्पष्ट केले आहे.

हाथरस प्रकरण : आरोपींच्या उलट्या बोंबा; म्हणे पीडितेच्या आई-भावानेच केली हत्या

आपण तिला भेटलो, त्यावेळी शेतात पीडितेची आई आणि भाऊही होते. आपले पीडितेला भेटणे तिच्या आई आणि भावाला आवडले नाही, त्यामुळे त्यांनी आपल्याला तिथून जाण्यास सांगितले. त्यानंतर आपल्याला गावातील लोकांकडून समजले, की पीडितेच्या आई आणि भावानेच तिला मारहाण केली. त्यात तिला गंभीर जखमा झाल्या आणि नंतर तिचा मृत्यू झाला. असे या आरोपींनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणात आपल्याला आणि आपल्या मित्रांना अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक विनीत जयसवाल यांना विचारणा केली असता, आपल्यापर्यंत अद्याप हे पत्र पोहोचले नसल्याचे म्हटले आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने आरोपींनी हे पत्र लिहिल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा :बिहार निवडणूक : पांडेजींचा पत्ता कट; बक्सर आणि वाल्मिकीनगरमधून निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले

Last Updated : Oct 9, 2020, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details