महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपला पराभूत करण्याचा काँग्रेसने इतर पक्षांना ठेका दिलाय का?

केजरीवाल यांच्या विजयानंतर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आनंद व्यक्त केला होता. चिदंबरम यांच्या ट्विटवर दिल्ली महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

भाजपला पराभूत करण्याचा काँग्रेसने इतर पक्षांना ठेका दिलाय का?
भाजपला पराभूत करण्याचा काँग्रेसने इतर पक्षांना ठेका दिलाय का?

By

Published : Feb 12, 2020, 2:07 PM IST

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धुळ चारत विजयी झेंडा रोवला. केजरीवाल यांच्या विजयानंतर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आनंद व्यक्त केला होता. चिदंबरम यांच्या ट्विटवर दिल्ली महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

'मी पूर्ण आदराने विचारू इच्छिते की, भाजपला पराभूत करण्याचा काँग्रेसने इतर पक्षांना ठेका दिला आहे का? जर असे नसेल, तर आपण आपल्या पराभवावर चिंता करण्याऐवजी आपच्या विजयावर आनंदी का होत आहोत ? जर असे असेल, तर आपण आपली दुकानं (राज्य काँग्रेस समित्या) बंद करायला हवीत', असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

आपचा विजय आणि धोकेबाज लोकांचा पराभव झाला आहे. दिल्लीच्या लोकांनी भाजपच्या विभाजनकारी आणि धुव्रीकरण राजकारणाचा पराभव केला. 2020 आणि 2021 मध्ये ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, त्या राज्यासमोर दिल्लीतील लोकांनी एक चांगले उदाहरण ठेवले आहे, असे चिदंबरम यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला दिल्लीकरांनी पुन्हा एकदा राजधानीच्या तख्तावर बसवले आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आपने ६२ जागा जिंकल्या तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details