चंदीगड- विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हरियाणा पोलिसांनी तब्बल १ कोटी ३३ लाखांची रक्कम जप्त कली आहे. पोलीस तपासणीदरम्यान गुरुग्रामध्ये एका गाडीमधून रक्कम जप्त करण्यात आली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. निवडणूक काळात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, ड्रग्ज आणि चांदी जप्त करण्यात आली.
पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाचे पथक अवैध वाहतूकीवर बारीक लक्ष ठेवून होते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रलोभने दाखवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक तपास नाक्यांवर रोकड आणि मतदारांना प्रलोभन म्हणून देण्यात येणाऱ्या विविध वस्तू जप्त करण्यात आल्या.
हेही वाचा -गुरु नानक पवित्र स्थळाकडे आता दुर्बीणीतून पाहायची गरज नाही - मोदी