गुरुग्राम -हरियाणाच्या गुरुग्राममध्ये रविवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला आहे. गोल्फ कोर्स रोडवर एका वेगवान कारने रस्त्यावरच्या दोन पादचाऱ्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. तर दोन्ही पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये वेगवान कारची दोन पादचाऱ्यांना धडक
हेही वाचा... जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाला भारतीय जनतेचा प्रचंड पाठिंबा - अल्ताफ हुसेन
गेल्या महिन्यात देखील फरीदाबाद-गुरुग्राम रोडवर असाच एक अपघात झाला होता. एक स्विफ्ट डिजायर कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने मोठा अपघात झाला होता. रविवारी रात्री गुरूग्राममध्ये झालेल्या या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा... चांद्रयान - २ : ऑर्बिटरपासून वेगळा होणार लँडर