महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणा सरकारचा आज शपथविधी, भाजप-जेजेपी स्थापन करणार सरकार - हरियाणा सरकारचा आज शपथविधी

हरियाणा राज्याच्या नव्या सरकारचा रविवारी दुपारी शपथविधी होणार असून, मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्रिपदाची, तर 'जेजेपी'चे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

हरियाणा सरकारचा आज शपथविधी

By

Published : Oct 27, 2019, 10:22 AM IST

चंदिगड -भाजपने हरियाणामध्ये अपक्षांबरोबरच 'जननायक जनता पक्षा'बरोबर (जेजेपी) हातमिळवणी केल्यानंतर, त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी हरयाणाच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.

हेही वाचा... कर्नाटकात डी. के. शिवकुमार यांचे जंगी स्वागत, 250 किलो सफरचंदांचा घातला हार

हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर दुसऱ्यांदा शपथ घेतील, तर जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करतील. हरयाणात दहा जागा जिंकणाऱ्या चौटाला यांच्या ‘जेजेपी’च्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दावा भाजपाने राज्यपालांकडे केला होता. त्यानुसार राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले, असे नियोजित मुख्यमंत्री खट्टर यांनी सांगितले. रविवारी देशभर दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना दुपारी २.१५ वाजता आमच्या सरकारचा शपथविधी सोहळा होईल, असे खट्टर म्हणाले.

हेही वाचा... जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 6 जवान जखमी

विधानसभा निवडणुकीत भाजपला ४० जागा मिळवल्या आहेत. बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता असल्यामुळे, १० जागा मिळविणारा 'जेजेपी' किंगमेकर ठरला. आता नव्या आघाडीमध्ये भाजपचे ४०, 'जेजेपी'चे १० आणि सात अपक्षांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details