चंदीगड -कोरोना विषाणूमुळे सर्व देशापुढे संकट उभे राहीले आहे. या आरोग्य आणिबाणीच्या काळात देश थांबला आहे. सर्व देशवासीय घरामध्ये अडकून पडले आहेत. मात्र, कोरोनासंबधी सर्व घडामोडींची माहिती पत्रकार घराघरांमध्ये पोहोचवत आहेत. अनेकवेळा ते जोखीम स्वीकारत आहेत. अनेक पत्रकरांना कोरोना झाल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकार कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
हरियाणा सरकार कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना विमा संरक्षण देणार
हरियाणा सरकारने कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना 10 लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी यांसबधीची माहिती दिली.
हरियाणा सरकारने कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना 10 लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी यांसबधीची माहिती दिली.
मुंबईत कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या 50 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तामिळनाडूतही 25 पेक्षा जास्त टीव्ही न्यूज चैनलच्या पत्रकारांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय खट्टर सरकारने घेतला आहे.