महाराष्ट्र

maharashtra

हरयाणामधील शेतकरी घेणार केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट

By

Published : Dec 14, 2020, 12:35 PM IST

आज हरयाणामधील शेतकरी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेणार आहेत. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर ते नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा करणार आहेत. उत्तराखंडच्या काही शेतकऱ्यांनी रविवारी नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली होती.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्याविरोधामध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. आज हरयाणामधील शेतकरी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेणार आहेत. यावेळी युवा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश यादवही उपस्थितीत असतील. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर ते नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा करणार आहेत. याचबरोबर एसवायएलवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडच्या काही शेतकऱ्यांनी रविवारी नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली होती. संबधित शेतकऱ्यांनी कृषी कायद्याला समर्थन दर्शवले होते. यावर ज्या लोकांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतील. ते शेतकरी नसून व्यवसायीक आहेत, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

अंबानी समूहावर बहिष्कार टाका -

शेतकरी संघटनांनी रविवारी पत्रकार परिषद घेत, आपली पुढील भूमिका जाहिर केली होती. कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन जारी राहणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेता शीव कुमार यांनी सांगितले होते. 15 डिसेंबरला शेतकरी बैठक घेणार असून आंदोलनाची पुढील दिशा मांडणार आहेत. जनतेने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिओ सिम पोर्ट करावं आणि अदानी आणि अंबानी समूहावर बहिष्कार टाकावा. जर आपण सरकारचे नाक बंद केलं तरच तोंड उघडेल, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.

आंदोलनाचा आज 19 वा दिवस -

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. या आंदोलनादरम्यान आज हे शेतकरी एका दिवसाचे उपोषण करणार आहेत. तसेच, आज देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आंदोलन करण्याचे आवाहनही शेतकऱ्यांनी केले आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. बुधवारी केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता. त्यानंतर रविवारी जयपूर-दिल्ली आणि दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस-वे बंद करण्यात आला होता. शेतकरी दिवसेंदिवस आपले आंदोलन तीव्र करत आहेत. तसेच, पंजाब-हरियाणामधील आणखी शेकडो शेतकरी, आणि इतर राज्यांमधील शेतकरीही दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत.

हेही वाचा -दिल्ली चलो आंदोलनाचा १९वा दिवस; आज शेतकऱ्यांचे उपोषण, पाहा LIVE अपडेट्स..

ABOUT THE AUTHOR

...view details