चंदीगढ - हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरू झाली आहे. २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या मतदानानंतर, आज (२४ ऑक्टोबर) या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, स्पेशल टास्क फोर्स आणि लष्कराच्या जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर गड राखतील की काँग्रेसचे भुपेंद्र हुडा भाजपकडून सत्ता खेचून आणण्यात यशस्वी होईल, हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती होण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
LIVE UPDATE -
- हरियाणा विधानसभेच्या ९० जागांचेही कल समोर
- भाजपने 40 जागांवर विजय मिळवला आहे.
- काँग्रेसनं ३1 जागांवर बाजी मारली आहे
- जेजेपी १० जागांवर विजय मिळवला आहे.
- इतर उमेदवारांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे.
- इंडियन नॅशनल लोक दलाने १ जागेवर विजय मिळवला आहे.
- माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुडा यांनी भाजपला राज्यात पराभूत करण्यासाठी इतर पक्षांना काँग्रेसला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे.
- महेंद्रगड मतदारसंघातून शिक्षणमंत्री रामविलास शर्मा पराभूत, काँग्रेसचे उमेदवार राव सिंह विजयी
- आदमपूर मतदार संघातून कुलदीप बिष्णोई विजयी. टिकटॉक स्टार सोनाली फोगटला केले पराभूत
- जेजेपी नेते दुष्यंत चौटाला उचाना मतदार संघातून विजयी. भाजप उमेदवार प्रेमलता यांना केले पराभूत
- अंबाला कंटोन्मेटमधून अनिल विज जिंकले. अपक्ष उमेदवार चित्रा सरावरा यांना केले पराभूत
- घरौंडा येथून भाजप उमेदवार हरविंद्र कल्याण विजयी. काँग्रेसच्या अनिल कुमार यांना केले पराभूत
- रेवाडी मतदार संघातून काँग्रेस उमेदवार चिंरजीव विजयी
- सोनीपतच्या बडौदा मतदार संघामधून भाजप उमेदवार आणि कुस्तीपट्टू योगेश्वर दत्त पराभूत
- काँग्रेस उमेदवार कृष्ण हुड्डा बडौदा मतदार संघातून विजयी
- काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून सरकार बनवण्याचं केलं आवाहन.
- काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा किलोई सांपला मतदार संघातून विजयी. भाजप उमेदवार सतिश नांदल यांचा केला पराभव
- नारनौद येथून भाजप उमेदवार कॅप्टन अभिमन्यू यांचा पराभव, जेजेपीचा उमेदवार विजयी. अभिमन्यू यांनी जनादेश स्विकारला
जेजेपी कार्यकारीणीची उद्या दिल्लीत बैठक
दिल्लीमध्ये उद्या जेजेपी पक्षाने बैठक आयोजित केली आहे. हरियाणा विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही. त्यामुळे जेजेपी किंगमेकर बनण्याची शक्यता आहे. जेजेपी पक्ष भाजपला पाठिंबा देवून सत्तेमध्ये येवू शकतो. किंवा काँग्रेस, जेजेपी आणि इतर उमेदवार असेही समीकरण जुळू शकते. राज्यात झालेल्या त्रिशंकू पार्श्वभूमीवर निकाल हाती येण्याच्या आधापासूनच नेत्यांनी हालचाली सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसने जेजेपी प्रमुख दुष्यंत चौटाला यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली अशी माहिती पुढे येत होती. याबाबत चौटाला यांना विचारले असता, अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुड्डा यांच्याशी चर्चा केली. सरकार बनवण्यासाठी दिले स्वातंत्र्य. सोनिया गांधी राज्यातील परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. जननायक जनता पक्ष हरियाणा विधानसभा निवडणुकीत किंगमेकरती भूमिका बजावणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
भाजपचा ९० पैकी ७५ जागांवर दावा
मुख्यमंत्री खट्टर यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने ७५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर एकीकडे काँग्रेस सर्वस्व पणाला लावून निवडणुकीत उतरली आहे. चौटाला कुटुंबामध्ये वाद झाल्याने जननायक जनता पक्ष निवडणुकीमध्ये एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. ईनोले, शिरोमणी अकाली दल आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष, लोकतंत्र सुरक्षा पक्ष आणि स्वराज इंडिया हे पक्षही निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, यातील कोणत्याही पक्षाने सगळ्या जागांवर निवडणूक लढवली नाही.