चंदीगढ - हरियाणामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर, आज (२४ ऑक्टोबर) या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, स्पेशल टास्क फोर्स आणि लष्कराच्या जवानांनाही तैनात करण्यात आले आहे.
५९ मतमोजणी केंद्रांवर ठरणार १,१६९ उमेदवारांचे भवितव्य..
विधानसभेच्या ९० जागांवर झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी ५९ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. गुरुग्राम जिल्ह्यातील बादशाहपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त मतदान केंद्र असल्यामुळे २ मतमोजणी केंद्र उभारली गेली आहेत. या ५९ मतमोजणी केंद्रांवर राज्यातील १,१६९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
एक्झिट पोल्सचा कल भाजपकडे..
मतदानाआधी आणि मतदानानंतरही विविध संस्थांनी घेतलेल्या एक्झिट पोल्समध्ये सध्या भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ६८.३० टक्के मतदान झाल्यामुळे, यंदा सरकार बदलण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे..
हरियाणा विधानसभा निवडणूक २०१९... आज येणार निकाल!
महाराष्ट्रासह आज हरियाणा विधानसभा निवडणूकांचेही निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाआधी आणि मतदानानंतरही विविध संस्थांनी घेतलेल्या एक्झिट पोल्समध्ये सध्या भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ६८.३० टक्के मतदान झाल्यामुळे, यंदा सरकार बदलण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
Haryana Assembly Elections 2019