नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करत भारताचे शास्त्रज्ञ २०३० सालापर्यंत देशाला नक्कीच जगातील टॉप-३ देशांच्या रांगेत बसवतील, असा विश्वास विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्ष वर्धन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'भारतीय शास्त्रज्ञ देशाला २०३० पर्यंत नक्कीच टॉप-३ देशांच्या रांगेत विराजमान करतील' - पंतप्रधान
मला भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी याआधीच भारताला टॉप-१० देशांत पोहचवले आहे. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करत २०३० पर्यंत भारताला टॉप-३ देशांच्या रांगेत विराजमान करतील.
हर्ष वर्धन म्हणाले, मला भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी याआधीच भारताला टॉप-१० देशांत पोहचवले आहे. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करत २०३० पर्यंत भारताला टॉप-३ देशांच्या रांगेत विराजमान करतील. भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती होण्यासाठी मी काम करेन. मी ९ नोव्हेंबर २०१४ साली प्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. हा अनुभव माझ्यासाठी सर्वात चांगला होता. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.