नवी दिल्ली - जागतिक तंबाखू विरोधी दिनी (नो टोबॅको डे) केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली. 'सर्जन असल्याने रुग्णच नाही तर अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्थ होताना मी पाहिली आहेत, त्यामुळे तंबाखू विरोधातील माझा लढा वैयक्तीक असल्याचेही ते म्हणाले'.
तंबाखूचा धोका समुळ नष्ट करण्यासाठी सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यास माझा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.
तंबाखूमुळे दरवर्षी 80 लाख मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रत्येक वर्षी तंबाखू कंपन्या 9 बिलियन डॉलर जाहिरीतींवर खर्च करतात. प्रामुख्याने तरुणांना तबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित केले जाते. त्यामुळे दरवर्षी 80 लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यावर्षीच्या नो टोबॅको डे चे अभियान तरुण आणि लहान मुलांना तंबाखूपासून वाचविण्यासाठी सुरु करण्यात आले आहे.
कोरोना संकट काळातही तंबाखू उत्पादन कंपन्यांनी उत्पादने मोठ्या प्रमाणात विकली. त्यामुळे नागरिकांची कोरोना संसर्गापासून बरे होण्याची क्षमता कमी झाली. कोरोना काळात तंबाखूजन्य पदार्थांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यासाठीही या कंपन्यांकडून प्रयत्न करण्यात आले. 13 ते 15 वयोगटातील 4 कोटी बालकांनी तंबाखूचे सेवन सुरु केल्याचे संघटनेने म्हटले आहे.