दमोह -एक माणूस, ज्याने अस्पृश्यांचं दु:ख जाणून घेवून त्याविरोधात सर्वात आधी आवाज बुलंद केला. याच विचाराने या माणसाला महात्मा बनवलं. या महात्माने हातात काठी घेवून अख्खा देश धुंडाळून काढला. याच दरम्यान या महात्म्याची पाउलं जिथे-जिथे पडली त्याच्या पाउलखुणा आजही अस्तित्वात आहेत. सबंध देश यावर्षी 2 ऑक्टोबरला या महात्म्याची 150 वी जयंती साजरी करत आहे.
'या' शहराच्या कणाकणात आहेत गांधीजी; हरिजन गुरूद्वारामध्ये आजही जाणवतं बापूंचं अस्तित्व इंग्रजाना धुळ चारण्यासाठी महात्मा गांधी जेव्हा देश पालथा घालत होते. त्याच दरम्यान त्यांची पाउलं जिथं जिंथ पडली ती त्या-त्या जागेचं वेगळं अस्तिस्व निर्माण होत गेलं. एकदा असच पदयात्रेच्या दरम्यान गांधीजी मध्य प्रदेशच्या दमोह येथे आले होते. याठिकाणी अजुनही त्यांच्या स्मृती पाहायला मिळतात. दमोहमध्ये महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघासह हरिजन गुरुद्वाराची पायाभरणी केली होती. याठिकाणी आजही बापूंची प्रतीमा लावलेली आहे. याठिकाणी सकाळ संध्याकाळ प्रार्थना केली जाते.
महात्मा गांधीनी इंग्रजांविरोधातील असहकार आंदोलनाची सुरुवात मध्य प्रदेशाच्या जबलपूरमधून केली होती. त्यावेळी अनेक गावांना भेटी देत गांधीजी दमोहला आले होते. याच दरम्यान त्यांनी कितीतरी सभा केल्या. त्याच्या स्मृती दमोह शहरात आजही आहेत. ज्यामुळे आजही बापूंच्या विचारांची आपल्याला जाणिव करून देतात. दमोह येथे राहणारे स्वातंत्र्य संग्राम सेनानी खेमचंद बजाज बापूंच्या या आठवणींचे साक्षीदार आहेत.
खेमचंद सांगतात की, 29 ऑक्टोबर 1933 ला महात्मा गांधी दमोहला आले होते. त्यावेळी गांधीजींनी ज्या ठिकाणी सभा घेतली होती, त्याच ठिकाणी गांधी चबुतऱ्याचं निर्माण करण्यात आले आहे. ज्या घरात गांधीजींनी वास्तव्य केले होते, ती वास्तू महात्मा गांधींच्या आगमनाची साक्षी आहे. एका गुजराती कुटुंबाचे हे घर आता पडीक वास्तू झाली आहे. परंतु, याठिकाणी महात्मा गांधींच्या आठवणी आजही ताज्या आहेत.
येथील व्यापाऱ्यांनी बापूंच्या सन्मानार्थ पायघड्या घातल्या होत्या, ज्यावरून ते सभास्थळी पोहचले होते. हेच कारण आहे की आजही गांधी चौकाजवळ कापड बाजार भरतो. याशिवाय गांधीजींच्या आणखीही आठवणी आहेत. दमोह आपल्या कला संस्कृतीसाठी प्रसिध्द आहे. परंतु, बापूंच्या आठवणी हा इथला प्राचीन ठेवा आहे. ज्यामुळे दमोहच्या वैभवात अजुनच भर पडली आहे.