महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मकर संक्रांतीला हरिद्वारमध्ये गंगा किनारी भाविकांची अलोट गर्दी - मकर संक्रांती हरिद्वार

मकर संक्रांतीच्या पाश्वभूमीवर या पाच घाटांशिवाय इतरही ठिकाणी गंगा स्नानाची व्यवस्था करण्यात येते. ब्रम्हकुंड, नारायणी स्त्रोत, विष्णू घाट शिला, कुशावर्त आणि रामघाट हे पाच घाट महत्त्वांचे असून येथे भाविकांची मोठी गर्दी होती.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 14, 2021, 11:15 AM IST

देहराडून - मकर संक्रांती सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी सुर्याचे उत्तरायण सुरू होते. धनू राशीतून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच १४ जानेवारीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होण्यास सुरूवात होते. उत्तराखंड राज्यात यास उत्तरायणी असे म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी भाविक गंगा नदीत अंघोळ करण्यासाठी येतात. यावेळी हरिद्वारमधील घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होते.

पाच घाटांवर होती भाविकांची गर्दी -

हरिद्वारमध्ये गंगा किनारी भाविकांची अलोट गर्दी

पहाटेपासूनच नदीच्या घाटावर भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. हरिद्वारच्या कणाकणांत भगवंताचा सहवास आहे, असे बोलले जाते. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी देशभरातील भाविकांची येथे गर्दी होते. गंगा नदीत स्नान करण्यासाठी हरिद्वारमध्ये महत्त्वाचे पाच घाट आहेत. ब्रम्हकुंड, नारायणी स्त्रोत, विष्णू घाट शिला, कुशावर्त आणि रामघाट हे पाच घाट महत्त्वांचे असून येथे भाविक गंगा नदीत डुबकी घेण्यासाठी गर्दी करतात. मकर संक्रांतीच्या पाश्वभूमीवर या पाच घाटांशिवाय इतरही ठिकाणीही भाविकांच्या स्नानाची व्यवस्था करण्यात येते.

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गंगा नदीत अंघोळ करणं पवित्र मानलं जाते. त्यामुळे भाविक महास्नान करण्यास मोठ्या प्रमाणात जमतात. उत्तराखंडमध्ये स्थानिक नागरिकांकडून लोकनृत्य आणि सांस्कृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details