नवी दिल्ली - स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण होते. पाकिस्तान नेहमी ना'पाक' डाव रचत भारताला उकसवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, याचे गंभीर परिणाम कारगिल युध्दाच्या रुपाने पाकलाच भोगावे लागले. या युध्दाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युध्दे झाली. 1965, 1971 आणि 1999 साली या दोन देशांमध्ये युध्दे झाली. तिनही युध्दात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. सगळ्यात शेवटी जे युध्द झाले, ते म्हणजे 1999 चे युध्द. या युध्दात भारताच्या 527 जवानांना वीरमरण आले आणि भारताने हे युध्द 26 जुलैला 1999 मध्ये जिंकले. यामुळे हा 26 जुलै हा 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणतात की, या युध्दात आमचे 2700 हून अधिक सैन्य मारले गेले.