महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला दहशतवादी हमजा बिन लादेनचा प्रवास - हामजा बिन लादेन

अमेरिकेने हमजा बद्दल माहिती देणाऱ्याला तब्बल १ लाख डॉलरचा इमान जाहीर केला होता. तसेच त्याचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला.

हामजा बिन लादेन

By

Published : Sep 15, 2019, 5:47 AM IST

Updated : Sep 15, 2019, 12:09 PM IST

नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमजा बिन लादेन ठार झाल्याची माहिती नुकतीच दिली आहे. हमजा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना 'अल कायदा'चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवर झालेल्या गोळीबारीमध्ये हमजा ठार झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जाणून घेऊया वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेल्या हमजा बिन लादेनबद्दल...

हमजा बिन लादेन बद्दल माहिती

हमजा हा ओसामा बीन लादेनच्या 20 अपत्यांपैकी १५ वे अपत्य आहे. ओसामाच्या तिसऱ्या पत्नीचा तो मुलगा आहे. हमजाचे वय ३० वर्षांच्या आसपास होते. ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर अल-कायदाची सूत्रे हळूहळू हमजाकडे येत होती. तसचे अमेरिका आणि पश्चिमी राष्ट्रांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न तो करत असल्याचेही गुप्तचर यंत्रणांच्या माहितीतून समोर येत होते. अनेक दहशतवादी संघटनांबरोबर हात मिळवून कमकूवत होत चाललेल्या अल कायदा संघटनेला पुन्हा जिवंत करण्याचे काम हमजा करत होता, त्यामुळे हमजाचा अमेरिका शोध घेत होती. अमेरिकेने हमजा बद्दल माहिती देणाऱ्याला तब्बल १ लाख डॉलरचा इमान जाहीर केला होता. तसेच २०१७ ला त्याचा समावेश दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत करण्यात आला होता. 'क्राऊन प्रिंस ऑफ जिहाद' असेही हमजाला बोलले जायचे.

अल कायदा संघटनेचे जगभर पसरलेले जाळे

मागील काही दिवसांमध्ये हमजा दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये मारला गेल्याचे वृत्त आले होते, मात्र, कोठे, कधी मारला गेला याबाबत माहिती पुढे येत नव्हती. अमेरिकेवर आणि पश्चिमी राष्ट्रांवर हल्ले घडवून आणणार असल्याचे अनेक संदेश त्याने व्हिडिओद्वारे प्रसारीत केले होते.

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतरची अल कायदा संघटना

२०११ मध्ये ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला. तसेच इसिस या दहशतवादी संघटनेचा उदय झाल्याने अल कायदा संघटना कमकूवत झाली होती. मात्र, अलिकडच्या काळात अल कायदा पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न हमजा करत होता. जगभरातील अनेक प्रादेशिक दहशतवादी संघटनांशी अल कायदा हात मिळवत आहे. तशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिली होती. अल कायदाची महत्त्वाकांक्षा वाढत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अल कायदा आणि सलग्न संघटनेतील दहशतवाद्यांची संख्या

अल-कायदाच्या संलग्न दहशतवादी संघटना

अल कायदा इन इस्लामिक मघरेब( AQIM) अल्जरियातील दहशतवादी गट अल कायदाची संलग्न झाल्यानंतर या संघटनेची स्थापना २००६ साली झाली. पश्चिम आफ्रिका आणि साहेल भागामध्ये ही संघटना आहे.

अल कायदा इन अरेबियन पेनिन्सूला(AQAP) - येमेन आणि सौदी अरेबिया देशातील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना एकत्र येवून ही संघटना २००९ साली स्थापन झाली.

अल कायदा इन इंडियन सबकाँटिनंट- ही संघटना अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, म्यानमार आणि बांग्लादेशात कार्यरत आहे. २०१४ साली ही संघटना स्थापन झाली.

जमात नुसरत अल इस्लाम वल मुस्लमीन(JNIM) - माली आणि पश्चिम आफ्रिकेतील अनेक दहशतवादी गट एकत्र येवून ही संघटना स्थापन झाली.

हयात ताहरीर अल शाम (HTS) सिरियामधील अनेक दहशतवादी गट मिळून ही संघटना स्थापन झाली आहे. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका दोघांनी या संघटनेला अल कायदाची संलग्न संघटना असल्याचे घोषित केले आहे.

अल कायदा इन इजिप्त- अल कायदाशी संलग्न दहशतवादी संघटना इजिप्त आणि सिरिया भागामध्ये काम करते.

आत्तापर्यंत अल कायदाने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची संख्या
Last Updated : Sep 15, 2019, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details