महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : झाकिर मूसाचा उत्तराधिकारी हामिद ललहारीचा खात्मा - terrorist hamid lalhari killed in jk

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 'काश्मीर खोऱ्यात झाकिर मूसाचा गटाचा खात्मा झाला आहे. तसेच, त्रालमध्येही हामिद आणि जैशशी संबंधित नवीद आणि जुनेद हे ठार झाले. हामिद ललहारी 2016 मध्ये सक्रिय झाला होता,' असे सिंह यांनी सांगितले.

जम्मू काश्मीर

By

Published : Oct 23, 2019, 2:38 PM IST

नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी मोठे यश मिळाले आहे. त्रालमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. यामध्ये गजवत-उल-हिंदचा म्होरक्या हामिद ललहारी याचाही समावेश आहे. दहशतवादी ललहारी याने झाकिर मूसा मारला गेल्यानंतर या गटाचे नेतृत्व स्वीकारले होते. झाकीर मूसा मे २०१९ मध्ये चकमकीत ठार झाला होता.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 'काश्मीर खोऱ्यात झाकिर मूसाचा गटाचा खात्मा झाला आहे. तसेच, त्रालमध्येही हामिद आणि जैशशी संबंधित नवीद आणि जुनेद हे ठार झाले. हामिद ललहारी 2016 मध्ये सक्रिय झाला होता,' असे सिंह यांनी सांगितले.

झाकिर मूसाचा उत्तराधिकारी हामिद ललहारीचा खात्मा

तो काकापोरामधील दहशतवादी हल्ला, पोलीस अधिकारी फैयाज अहमद याची हत्या आणि नागरिकांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. त्याचा अवंतीपोरा आणि पुलवामा भागात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्येगही तो सामील होता. चकमकीत मारले गेलेले इतर दोन दहशतवादी नवीद आणि जुनेद यांनाही हामिदनेच आपल्या गटात सामील करून घेतले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details