लखनऊ -दरवर्षी होणाऱ्या ’हज यात्रे'वर यंदा कोरोनाचे सावट पसरले आहे. कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ही यात्रा रद्द झाली तर अर्ज केलेल्या सर्वांना पैसे परत केले जाणार आहेत. या बाबतचा निर्णय ‘हज कमिटी ऑफ इंडिया'ने घेतला आहे. तुर्तास हज यात्रेची तयारी थांबलेली आहे. सौदी अरबकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे हज यात्रा रद्द होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.
कोरोना इफेक्ट: 'हज यात्रा 2020' रद्द होण्याची दाट शक्यता - हज यात्रा 2020
कोरोना विषाणूमुळे यंदाच्या यात्रेला सौदी अरबकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने जवळपास ही यात्रा रद्द होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण जगातून 20 लाखांपेक्षा जास्त संख्येने हाजी यात्रेला उपस्थिती दर्शवतात. याआधीच इंडोनेशिया आणि सिंगापूर देशांनी आपल्या नागरिकांना हज यात्रेला जाऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
हज यात्रेसंबंधी सौदी अरब सरकारकडून मार्गदर्शक सूचना न मिळाल्यामुळे हज कमिटी ऑफ इंडियाने वेगवेगळ्या राज्यातील हज समितींना यात्रेची तयारी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नोंदणी करणाऱ्या हाजिंचे पैसेही परत केले जाणार असल्याचा निर्णय कमिटीने घेतला आहे.
भारतातून सर्वात जास्त संख्येने हाजी हे उत्तर प्रदेशमधून हज यात्रेला जातात. यावर्षी 28 हजार लोकांनी हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केले होते. कोरोना विषाणूमुळे यंदाच्या यात्रेला सौदी अरबकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने जवळपास ही यात्रा रद्द होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण जगातून 20 लाखांपेक्षा जास्त संख्येने हाजी यात्रेला उपस्थिती दर्शवतात. याआधीच इंडोनेशिया आणि सिंगापूर देशांनी आपल्या नागरिकांना हज यात्रेला जाऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
Conclusion: