बंगळुरु - कर्नाटकात अनेक दिवसांपासून चालू असलेले राजकीय नाट्य भाजपचे बी. एस येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाल्यानंतरच संपले. मात्र, जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांनी भाजप सरकार लवकरच पडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे निवडणुकांना तयार रहा, असे आवाहन त्यानी मंड्या येथे जेडीएसच्या कार्यकर्त्यांना केले.
निवडणुकांच्या तयारीला लागा, भाजप सरकार जास्त काळ टिकणार नाही - कुमारस्वामी - disqualified mla
मला खात्री आहे, भाजप सरकार जास्त दिवस सत्तेवर राहणार नाही. तसेच आता काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करणार नाही - कुमारस्वामी
मला खात्री आहे, भाजप सरकार जास्त दिवस सत्तेवर राहणार नाही. अपात्र ठरवण्यात आलेल्या १७ आमदारांच्या मतदारसंघात निवडणुका होतील, किंवा संपूर्ण राज्यात २२४ जागांवरही निवडणुका होतील, त्यामुळे तयार राहण्याचा सल्ला कुमास्वामींनी कार्यकर्त्यांना दिला. आता काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. त्यांची आम्हाला(जेडीएस) गरज नाही. मला सत्ताही नको. मला तुमचे प्रेम हवे आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
कुमारस्वामींच्या वक्तव्यावर भाजपचे जेष्ठ नेते जगदीश शेट्टार यांनी उत्तर दिले आहे. कुमास्वामींचे बोलणे गंभीरपणे घ्यायची गरज नाही. देवेगौडा आणि कुमारस्वामी जेव्हाही निवडणुका हरतात, तेव्हा राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे बोलतात, असा टोला शेट्टार यांनी मारला.