भोपाल- कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या माहामारीचा मुकाबला करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहीजे असे सगळ्यांना वाटते. जेणेकरुन कोरोनाचा लवकरच बिमोड होईल. मध्ये प्रदेश येथील ग्वालियर जिल्ह्यातील एका सॉफ्टवेअर अभियंत्याने असेच काहीसे केले आहे. त्याने एक ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. ज्याद्वारे कोरोना विषाणूच्या आजाराशी संबंधित प्रत्येक सूचना आणि रुग्णांची माहिती पंतप्रधान कार्यालय, आरोग्य विभाग किंवा कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अवघ्या काही सेकंदात पाठविली जाऊ शकते. कपिल गुप्ता असे त्याचे नाव आहे.
हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'