भोपाळ- ३० जानेवारी १९४८ ला गांधीजी हे त्यांच्या रोजच्या प्रार्थना सभेला जात होते. यावेळी, दिल्लीच्या बिर्ला हाऊसच्या आवारात एका मारेकऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झा़डल्या. भारताला स्वातंत्र्य मिळून वर्षही झाले नव्हते, तेवढ्यातच गांधीजींच्या जाण्याने पूर्ण देशाला धक्का बसला.
ग्वाल्हेर : गांधी हत्येच्या कटाचे पाप माथी असलेले शहर
संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या गांधीजींचा शेवट हा हिंसेने व्हावा, ही इतिहासातील सर्वात मोठी शोकांतिका असावी. गांधीजींच्या हत्येचे देशभरात त्वरीत आणि दूरगामी पडसाद उमटले..
assassination of mahatma gandhi
गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याने त्यांच्या हत्येसाठी ज्या ठिकाणी पिस्तूल घेऊन ते चालवण्याचा सराव केला, ते ठिकाण म्हणजे ग्वाल्हेर.
हेही पहा : छिंदवाडा : गांधीजींनी जिथे असहकार चळवळीचा रचला पाया