जिंद (हरियाणा) -कृषी कायद्याची मागणी पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण देशात तीन दिवस टोल प्लाझा विनामूल्य केले आहेत. भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंग चढूनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम चढूनी म्हणाले की, आता हरियाणामध्ये टोल प्लाझा तीन दिवसांसाठी नव्हे तर कायमस्वरूपी विनामूल्य होतील. ते म्हणाले की जोपर्यंत सरकार कृषी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत हरियाणामध्ये शेतकरी सर्व टोल प्लाझा विनामूल्यच करतील.
गुरनाम चढूनी विनामूल्य टोल निर्णय शेतकऱ्यांच्या समित्या करणार टोलनाक्यावर धरणे
त्यांनी सांगितले की, जिंदसह ते एतर काही टोल प्लाझावरही गेले होते. तिथे त्यांनी काही जणांची मते घेतली. इतकेच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांची मतं जाणून घेतली. ज्यातून हरिणामध्ये टोल फ्री केले जावे हे समोर आले. त्यानंतर, राष्ट्रीय कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे की हरियाणाचे सर्व टोल कृषी कायदे रद्द होईपर्यंत विनामूल्य राहतील. टोल विनामूल्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या समित्या धरणे आंदोलन करत राहतील. जिथे समिती नसेल तिथे 5,11 आणि 21 सदस्यांची समिती बनवावी, असे गुरनाम यांनी सांगितले आहे. त्यानंतर टोल प्लाझावर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्यात येईल.
हेही वाचा -AUS vs IND : कर्णधार रहाणेच्या झुंजार शतकामुळे भारत 'फ्रंट फुट'वर