महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लुधियाणाच्या व्यावसायिकाने दुकानाला दिले “गुप्ता & डॉटर्स” नाव, फोटो होतोय व्हायरल

लैंगिक स्टीरिओटाइप्स मोडत लुधियानाच्या एका व्यवसायिकाने त्याची मुलगी आकांक्षाच्या नावावर दुकानाचे नाव 'गुप्ता आणि डॉटर्स' असे ठेवले. मनोज कुमार गुप्ता असे या व्यावसायिकाचे नाव आहे. गुप्ता यांनी काही वर्षांपूर्वी स्वत:ची कंस्ट्रक्शन कंपनी सुरू केली आणि त्याला गुप्ता & सन्स नाव दिले.

ludhiyana
लुधियाणाच्या व्यावसायिकाने दुकानाला दिले “गुप्ता & डॉटर्स” नाव, फोटो होतोय व्हायरल

By

Published : May 29, 2020, 1:10 PM IST

लुधियाणा (पंजाब) - वडिल आणि मुलाच्या नावाचे समिकरण सर्वश्रूत आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून एका मेडिकल दुकानाच्या पाटीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पाटीवर लिहिलंय “गुप्ता & डॉटर्स”. या फोटोला ट्विटरवर तब्बल ६ हजारांवर लाईक्स मिळाले आहेत.

लैंगिक स्टीरिओटाइप्स मोडत लुधियानाच्या एका व्यवसायिकांने त्याची मुलगी आकांक्षाच्या नावावर दुकानाचे नाव 'गुप्ता आणि डॉटर्स' असे ठेवले. मनोज कुमार गुप्ता असे या व्यावसायिकाचे नाव आहे. गुप्ता यांनी काही वर्षांपूर्वी स्वत:ची कंस्ट्रक्शन कंपनी सुरू केली आणि त्याला गुप्ता & सन्स नाव दिले.

हे दुकान उघडताना ते नावाचा विचार करत होते. यादरम्यान ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे स्लोगन बघून त्यांनी दुकानाला मुलीचे नाव देण्याचे ठरवले. त्यांच्या घरच्यांनादेखील त्यांची ही कल्पना आवडली. हे लिंग समानतेचे प्रतीक आहे, असे गुप्ता सांगितात.

त्यांची मुलगी आकांक्षा ही वकिलीचे शिक्षण घेत आहे. आकांक्षा सांगते, की लिंग समानतेसाठी तिच्या आई-वडीलांनी घेतलेल्या पुढाकाराचा तिला अभिमान वाटतो.

ABOUT THE AUTHOR

...view details