श्रीनगर - दक्षिण काश्मिरच्या शोपियन जिल्ह्यात आतेरिकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी संबंधित एन्काऊंटर करण्यात आला असून सध्या सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. यामध्ये डायरू आणि शोपियन प्रांतांचा समावेश आहे. जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.
दक्षिण काश्मिरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एकाला कंठस्नान - terrorist attack in kashmir
दक्षिण काश्मिरच्या शोपियन जिल्ह्यात आतेरिकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी संबंधित एन्काऊंटर करण्यात आला असून यामध्ये एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे.
दक्षिण काश्मिरच्या शोपियन जिल्ह्यात आतेरिकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली.
यादरम्यान, लपलेल्या घुसखोरांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला चढवला. हा हल्ला परतवताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्याची माहिती मिळत आहे. डायरू भागातील चकमकीत हा दहशतवादी ठार झालाय. खबरदारीसाठी काही ठिकाणी नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
तसेच आता मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेश हातात घेण्यात आले असून काही भाग सील करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे.
Last Updated : Apr 17, 2020, 12:09 PM IST