नवी दिल्ली - भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी बुधवारी सकाळी भाजप मुख्यालयामध्ये ठेवण्यात आला होता. अंत्यदर्शनावेळी एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी भावूक झाले आणि रडायला लागले.
'MDH'चे मालक गुलाटींनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन, अश्रु अनावर - लंडन
सुषमा स्वराज यांच्या अंत्यदर्शनावेळी एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी भावूक झाले आणि रडायला लागले.
!['MDH'चे मालक गुलाटींनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन, अश्रु अनावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4067788-thumbnail-3x2-mdh.jpg)
माजी परराष्ट्र मंत्री तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव आज दुपारी १ वाजता भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. यावेळी श्रद्धांजली वाहताना एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांना अश्रु अनावर झाले.
धर्मपाल यांचे वय 96 वर्षे आहे. एमडीएच मसाले उद्योग त्यांनीच उभा केला होता. धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार आहेत. ते एमडीएच मसाल्याचीच जाहिरात करतात. १९५९ मध्ये एमडीएच कंपनीची स्थापना झाली होती. त्यांच्या भारतात १५ कंपन्या आहेत. दुबई आणि लंडनमध्ये या कंपनीची कार्यालये आहेत. ही मसाला कंपनी जवळपास १०० देशांमध्ये उत्पादने निर्यात करते.