महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संचारबंदीत लग्नाचा वाढदिवस साजरा; राजस्थानच्या माजी गृहमंत्र्यांकडून नियम धाब्यावर

राजस्थाच्या माजी गृहमंत्र्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर झाला असून विरोधी पक्षांनी कारवाईची मागणी केली आहे.

gulabchand-kataria-and-bjp-workers-violate-social-distancing
gulabchand-kataria-and-bjp-workers-violate-social-distancing

By

Published : May 3, 2020, 10:05 AM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये लॉकडाऊन असताना संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत राजस्थाच्या माजी गृहमंत्र्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर झाला असून विरोधी पक्षांनी कारवाईची मागणी केली आहे.

gulabchand-kataria-and-bjp-workers-violate-social-distancing

राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी कायदा पायदळी तुडवून संचारबंदीत लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. लग्नाचा 52 वाढदिवस त्यांनी साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघंन करण्यात आले. यावेळी 20 पेक्षा अधिक लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी ही महाराष्ट्रातील भाजप नेत्याने धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details