महाराष्ट्र

maharashtra

गुजरातमध्ये मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, 125 पेक्षा जास्त मुलांची सुटका

By

Published : Dec 29, 2019, 1:25 PM IST

Updated : Dec 29, 2019, 3:44 PM IST

मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या १२५ पेक्षा जास्त मुलांची गुजरात पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी सुरत  शहरातील पुनागाम परिसरात मानवी तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

child trafficking
तस्करी करण्यात येणारी बालके

गांधीनगर - मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या १२५ पेक्षा जास्त मुलांची गुजरात पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी सुरत शहरातील पुनागाम परिसरात मानवी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सोडवण्यात आलेली सर्व मुले गुजरात-राजस्थान सीमेवरील गावांमधील आहेत.

हेही वाचा -'देशातील युवकांना अराजकता आणि अव्यवस्थेविरूद्ध चीड'

राजस्थान पोलीस, राजस्थान बाल विकास आरोग्य विभाग आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने ही कारवाई केली. यामध्ये १२५ पेक्षा जास्त बाल मजुरांना सोडवण्यात आले आहे. या मुलांना विविध आमिष दाखवून मजुरी करण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा -केवळ 'भारत माता की जय' म्हणणारेच भारतात राहू शकतात; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य

सुरतमधील पुणा पोलिसांसोबत मिळून या प्रकरणी कारवाई केली. शहरातील सीतानगर परिसरातील सोसायटीतील घरांवर छापा मारला. यामध्ये प्रत्येक घरातून २५-२५ मुलांना कोंडून ठेवण्यात आले होते. काही अल्पवयीन मुले जेवण बनवताना आढळली.

या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सोपवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. ज्यांच्या पालकांना पत्ता मिळणार नाही त्यांना सुधारगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Last Updated : Dec 29, 2019, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details