नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडांच्या रक्कमेत बदल करत त्यात कमालीची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून सरकारविरोधात रोष दिसत आहे. 1 सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमजबजावणी करण्यात येत आहे. मात्र, गुजरातमध्ये दंडाची रक्कम जवळपास 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आज घेतला. त्यामुळे गुजरातमधील वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - 'तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम'
मोटार कायद्यातील नवीन बदलानुसार हेल्मेट न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. हाच दंड आता गुजरातमध्ये कमी करून 500 रुपये करण्यात आला आहे. तसेच सीट बेल्ट न घातल्यास 1 हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद या नवीन नियमात आहे. मात्र, गुजरातमध्ये ही रक्कम कमी करून 500 रुपये करण्यात आली आहे. वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास आता दुचाकी वाहनचालकांना २ हजार रुपये तर अन्य वाहनधारकांसाठी ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. या अगोदर दंडाची रक्कम 5 हजार रुपये होती. तर, नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्रिपल सीट वाहन चालवल्यास आकारला जाणारा १ हजार रुपयांचा दंड आता १०० रुपये करण्यात आला आहे.
हेही वाचा - ओवेसींचा आंबेडकरांना दे धक्का, इम्तियाज जलीलांना आघाडीचा सर्वाधिकार
दिल्लीमध्येही दर कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.