गांधीनगर -देशामध्ये नागरिकत्व सुधारणा काद्याविरोधात आंदोलन सुरू असून अनेक हिंसाच्या घटना घडत आहेत. तर याच दरम्यान एका पाकिस्तानी महिलेला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. द्वारकाचे जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार यांनी टि्वट करून याबाबत माहिती दिली आहे.
गुजरातमधील द्वारका येथे हसीनाबेन अब्बासअली वरसारीया या पाकिस्तानी महिलेला भारतीय नागरिक्तव देण्यात आले आहे. हसिना या मूळ भारतीय आहेत. एका पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केल्यानंतर 1999 ला त्या पाकिस्तानला स्थलांतरित झाल्या होत्या.