गांधीनगर -गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. परिसरातील बॅरिकेड्स हटवताना पोलिसांनी अडवल्यामुळे संतप्त जमावाने दगडफेक केली. याप्रकरणी ६८ लोकांना अटक करण्यात आली आहे. राजकोटच्या जंगलेश्वर परिसरात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार केला.
गुजरातेत पोलिसांवर दगडफेकप्रकरणी ६८ जणांना अटक - गुजरात पोलीस बातमी
शहरातील इतर कंटनेमेंट झोनमधील बॅरिकेड्स हटवले असतानाही केवळ आमच्याच परिसरातील बॅरिकेड्स न हटवल्याने ते नाराज होते, अशी माहिती पोलीस अधिकारी व्ही. के. गढवी यांनी दिली.
गुजरातेत पोलिसांवर दगडफेकप्रकरणी ६८ जणांना अटक
बॅरिकेड्स न हटवल्याने स्थानिक नाराज होते. शहरातील इतर कंटनेमेंट झोनमधील बॅरिकेड्स हटवले असतानाही केवळ आमच्याच परिसरातील बॅरिकेड्स न हटवल्याने ते नाराज होते, अशी माहिती पोलीस अधिकारी व्ही.के.गढवी यांनी दिली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याचेही गढवी म्हणाले. दरम्यान, परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.