महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अहमदाबाद-मुंबई धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं उद्धाटन; १९ तारखेपासून करु शकता बुकींग - तेजस एक्सप्रेस

अहमदाबाद- मुंबई दरम्यान धावणाऱ्या आलिशान तेजस एक्सप्रेसचे आज लोकार्पण होणार आहे. ही खासगी रेल्वे असून तिच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

तेजस एक्सप्रेस
तेजस एक्सप्रेस

By

Published : Jan 17, 2020, 11:49 AM IST

गांधीनगर - अहमदाबाद- मुंबई दरम्यान धावणाऱ्या आलिशान तेजस एक्सप्रेसचे आज लोकार्पण होणार आहे. ही खासगी रेल्वे असून तिच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी तेजस एक्सप्रेसचे उद्धाटन करणार आहेत.

अहमदाबाद-मुंबई धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं उद्धाटन
१९ तारखेपासून रेल्वे अहमदाबाद- मुंबई दरम्यान नियमित धावणार आहे. प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. व्हीआयपी डब्यांमध्ये प्रत्येक सीटला एलईटी स्क्रिन लावण्यात आली आहे, तसेच वायफाय सुविधाही देण्यात आली आहे. तेजस एक्सप्रेस ताशी १६० कि.मी वेगाने धावणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details