गुजरात- उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यातील पोलीस कॉन्स्टेबल संजय सोलंकी हे दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील विजलपूर येथे कार्यरत आहेत. त्यांची पत्नी गरोदर असतानाच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे गरोदर पत्नीला सोडून संजय देशासाठी कर्तव्यावर गेले.
हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
संकट ओळखून संजय यांनी देशाची सेवा करण्याचा विचार केला. आपल्या गरोदर पत्नीला सोडून ते कर्तव्यावर गेले. त्यांना सुट्टीचा अर्ज करता आला असात मात्र, त्यांनी तसे केले नाही. दरम्यान, त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिल्याची संजय यांना बातमी मिळाली. त्यावेळी ते कर्तव्य बजावत होते. तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून आपल्या बाळाला पाहिले.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 12वा दिवस आहे.